Photo Gallery

निवेदकांच्या गावा जावे
रविवार २३ नोव्हें २०२५- पुणे

उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट, पुणे शाखा तर्फे

निवेदकांच्या गावा जावे..

रसिकप्रिय दिग्गज निवेदक-मुलाखतकार द्वयी, आदरणीय मंगलाताई खाडिलकर आणि सुधीर गाडगीळ ह्यांनी पुणेकर रसिकांच्या हाऊसफुल्ल प्रतिसादात, निवेदनाच्या क्षेत्रातील उत्तुंग अनुभवांचा आणि आपल्या चौफेर व्यासंगाचा खजिना गप्पांच्या ओघात रिता केला.

लोकप्रिय अभिनेता, निवेदक विघ्नेश जोशी ह्यांनी आपल्या दिलखुलास आणि खुमासदार शैलीत गप्पांच्या गावाकडची ही सफर संस्मरणीय केली. अनेक मान्यवर कलाकार, साहित्यिक आणि रसिकांच्या भरगच्च उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.

‘गुरुबानी’ - गुरु-शिष्य परंपरेचा अनोखा मिलाप
रविवार २१ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजता - सहयोग मंदिर, पहिला मजला, घंटाळी, ठाणे.

उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट,ठाणे शाखा तर्फे

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्येष्ठ गुरुजनांच्या सहवासात आणि त्यांच्या आशीर्वादाने परिपूर्ण अशी एक संगीतमय संध्याकाळ –

‘गुरुबानी’
गुरु-शिष्य परंपरेचा अनोखा मिलाप

सादरकर्ते आश्वासक विद्यार्थी:
अद्वैत काशीकर – बासरी वादन
आसावरी वझे – कथ्थक नृत्य
श्रेयस व्यास – शास्त्रीय गायन

विशेष उपस्थिती:
गुरु पंडित. आनंद काशीकर
गुरु विदुषी राजश्री शिर्के
गुरु पंडित. सुरेश बापट

उत्तुंग ३०वर्षपूर्ती आनंदसोहळा - उत्तुंग सन्मान प्रदान समारंभ आणि ``माणिकस्मृती' सांगीतिक स्वरांजली
रविवार, २५ मे २०२५. कोथरूड, पुणे.

समारोह अध्यक्ष: मा. अविनाश धर्माधिकारी

१) पूर्वार्ध: वार्षिक उत्तुंग सन्मान वितरण

सन्मानमूर्ती:

डॉ. आनंद नाडकर्णी

श्री. विद्याधर निमकर

डॉ. श्रीरंग गोडबोले

महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे

२) उत्तरार्ध: ज्येष्ठ गायिका विदुषी पद्मश्री पंडिता माणिक वर्मा ह्यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्त,

माणिकस्मृती” स्वरांजली

संकल्पना-मार्गदर्शन: आशाताई खाडिलकर

उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट , नादब्रह्म आणि संगीतभूषण पं. राम मराठे फाऊंडेशन प्रस्तुत , ``गोविंद गुणस्मरण``
१३ एप्रिल २०२५. विलेपार्ले पूर्व मुंबई.

उत्तुंग पुणे शाखा आयोजित, “सूर संगत” – अभिजात शास्त्रीय वादनाची नवोन्मेषी जुगलबंदी
८ फेब्रुवारी २०२५. संध्या. ६. वाजता गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे.